झटपट रवा डोसा :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. १ वाटी रवा, १ वाटी तांदुळाची पिठी, व १/४ वाटी मैदा, सर्व एकत्र मिसळून घ्यावे.
२. त्यात २ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून मिऱ्याची पूड, १ टेबलस्पून किसलेले आलं, चवीप्रमाणे मीठ, व आवडीप्रमाणे हिरव्या मिर्च्यांचे बारीक तुकडे घालावेत.
३. हळू हळू पाणी घालत व हाताने सर्व मिसळत, ताकाप्रमाणे पातळ पीठ तयार करावे.
४. १ कांदा बारीक चिरून घ्यावा.
५. तवा गरम करून मध्यम आचेवर ठेवावा. त्यावर आधी १/४ टीस्पून तेल व मग बारीक चिरलेला कांदा पसरावा.
६. वर तयार केलेले पीठ, चमच्याने पुन्हा एकसारखे करून, गरम तव्यावर एकसारखे पातळ पसरून घालावे. कडेने व डोस्याच्या मधे १/२ टीस्पून तेल पसरावे व डोसा खालून तपकिरी रंगाचा होईपर्यंत शिजू द्यावा व मग उलतन्याने दुमडून बशीत काढावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा