कढिलिंबाची चटणी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. २ वाट्या कढिलिंबाची पाने मायक्रोवेव मधे १-२ मिनिटे गरम करून घ्यावीत. पूर्ण गार झाल्यावर पाने कुरकुरीत व्हायला हवीत.
२. १/२ वाटी तीळ गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावेत.
३. भाजलेले तीळ, कढिलिंबाची पाने, १/२ वाटी डाळं, १& १/२ टीस्पून आमचूर, १ टीस्पून साखर, चवीप्रमाणे मीठ व तिखट, हे सर्व एकत्र करावे व मिक्सर मधे भरड वाटावे.
४. ही पौष्टिक कढिलिंबाची चटणी कोरडीच किंव्हा थोड्या तेलाबरोबर जेवणात वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा