लेमन राइस :
(सर्व सामग्री रेखांकित केले आहे)
१. दोन वाट्या जास्तीचा किंव्हा ताजा भात घ्यावा. पण भात मोकळा असावा मऊ असू नये.
२. १ टीस्पून हरभऱ्याची डाळ थोड्या पाण्यात २० मिनिटे भिजत घालावी.
३. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/४ टीस्पून हिंग, १/२ टीस्पून हळद, २ हिरव्या मिर्च्या उभ्या चिरून, २ वाळलेल्या लाल मिर्च्या, १ टीस्पून उडदाची डाळ, व १ टेबलस्पून दाणे घालावेत. डाळ व दाणे गुलाबी होईपर्यंत परतावे.
४. आता भिजविलेली हरभऱ्याची डाळ घालून थोडे परतावे व भात घालावा.
५. चवीप्रमाणे मीठ, १ & १/२ टीस्पून लिंबाचा रस घालून एखादा मिनिट परतावे व मग गॅस बंद करावा.
६. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून लेमन राइस खायला द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा