पाव भाजी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. एक फ्लॉवर , एक डब्बू मिर्ची, व ५ मध्यम आकाराचे बटाटे सालं काढून घ्यावेत. प्रत्येकाचे एक एक वाटी मोठे चौकोनी तुकडे करून घ्यावेत.
२. वरील भाज्यांमध्ये १ वाटी मटारचे दाणे घालावेत व सर्व एका कुकर च्या भांड्यात घालून कुकर मध्ये एक शिट्टी यॆईपर्यन्त शिजवून घ्यावे. एक शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करावा व ५ मिनिटांनी बंद करावा. (वरील भाज्यांमधे आपल्या आवडीनुसार इतर भाज्याही जसे पत्ता कोबी, व फरसबी च्या शेंगा ही एक एक वाटी घालायला हरकत नाही)
३. कुकर गार झाल्यावर शिजलेल्या भाज्या बाहेर काढून पळीने किंव्हा रवीने कुस्करून बाजूला ठेवाव्यात.
४. एका मिक्सर मध्ये २" मोठा आल्याचा तुकडा, ५-६ मोठ्या लसणाच्या पाकळ्या, १ छोटा कांदा, व १ टोमॅटो, सर्व एकत्र बारीक वाटून ग्रेवी तयार करावी.
५. एका कढईत २ & १/२ टेबलस्पून लोणी किंव्हा तेल गरम करून त्यात वरील तयार केलेली ग्रेवी व ३ टीस्पून पाव भाजी मसाला घालावा. ही ग्रेवी तपकिरी रंग यॆईपर्यन्त परतावी.
६. त्यात वरील कुस्करलेल्या भाज्या, चवीप्रमाणे मीठ, व अंदाजे १ वाटी पाणी घालावे. बारीक गॅस करून उकळू द्यावे. मग गॅस बंद करावा.
७. प्रत्येक पावाचे आडवे अर्धे काप करून आतील दोन्ही बाजूंस लोणी लावावे व तव्यावर भाजावेत.
८. वाढताना एका ताठलीत गरम पावाबरोबर गरम भाजी घालावी. भाजीवर चवीप्रमाणे थोडे तिखट, थोडे लोणी, बारीक चिरलेला कांदा, व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व बरोबर एक लिंबाची फोड द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा