मंगळवार, १२ मे, २०१५

डाळ वडा / Dal Vada

डाळ वडा :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ वाटी हरभऱ्याची डाळ ३-४ तास पाण्यात भिजत घालावी. भिजल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. ह्यामुळे डाळीचा उग्र वास जाईल. 


२. भिजलेली डाळ, ३ मिर्च्या, २" मोठा आल्याचा तुकडा, ७-८ लसणाच्या पाकळ्या, व चवीप्रमाणे मीठ, सर्व मिक्सर मध्ये भरड वाटून घ्यावे. वाटताना कमीतकमी पाणी घालावे. 


३. त्यात १ बारीक चिरलेला कांदा, व १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

४. एका कढईत तेल गरम करावे. हाताने किंव्हा चमच्याने पिठाचे छोटे छोटे गोळे तेलात टाकून ते गरम तेलामधे गुलाबी रंगावर तळून काढावेत. 

 

 




४. तळलेले वडे एका पेपर टॉवेल वर काढावेत व कोथिंबिरीच्या चटणी बरोबर गरम गरम खायला द्यावेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा