स्प्रिंग डोसा :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
सारणासाठी :
२. २-३ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/४ वाटी किसलेले गाजर, १/४ वाटी बारीक चिरलेला पातीचा कांदा, १/४ वाटी भरड वाटलेला फ्लॉवर, व १/४ वाटी बारीक चिरलेली डब्बू मिर्ची घालावी.
३. २ मिनिटे परतून त्यात चवीप्रमाणे मीठ, व १ टीस्पून संभार मसाला घालावा. सर्व मिसळावे.
४. त्यात बटाटा व कांद्याचा मसाला मिसळावा व गॅस बंद करावा.
डोस्यासाठी :
२. तवा गरम करून मध्यम आचेवर ठेवावा. तव्याच्या मधोमध अंदाजे ३ टेबलस्पून डोस्याचे पीठ घालावे व पळीने पातळ व गोल पसरावे.
३. कडेने व मध्ये १ टीस्पून तेल सोडावे व डोसा खालून गुलाबी व्ह्यायला लागल्यावर, मधे ३-४ टेबलस्पून मसाला घालावा व डोसा दोन्हीबाजूंनी दुमडावा.
४. गरम गरम स्प्रिंग डोसा सांभार व चटणी बरोबर खायला द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा