शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

धिरडी / Dhirde

धिरडे :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)


१. एका भांड्यात १ वाटी कणीक (गव्हाचे पीठ)१/४ वाटी डाळीचं पीठ१/४ वाटी तांदुळाची पिठी१/४ वाटी ज्वारीचे किंव्हा बाजरीचे पीठ, सर्व मिसळावे. 

२. त्यात २ टेबलस्पून तेलचवीप्रमाणे मीठ१ टेबलस्पून लसणाची पेस्ट१ टीस्पून वाटलेली मिर्ची किंव्हा आवडीप्रमाणे लाल तिखट, घालावे. 

३. त्यात १/४ वाटी कुठलीही भाजी, जसे, किसलेले गाजर, बारीक चिरलेल्या पालकाची किंव्हा मेथीची पाने, बारीक चिरलेली पत्ता कोबी, किंव्हा किसून दूधभोपाळा घालावा. 

४. २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

५. आता पाणी घालून, हाताने गोळे मोडत, डोस्याच्या पिठाप्रमाणे दाटसर पीठ भिजवावे. 

६. गॅसवर तवा गरम व्हायला ठेवावा. तव्याच्या मधोमध ४ टेबलस्पून पीठ घालून एकसारखे गोल व पातळ पसरावे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा. १/२ टीस्पून तेल सर्व बाजूंनी सोडावे व कडा गुलाबी दिसायला लागल्यावर उलटून टाकावे. 

७. दुसऱ्या बाजूस ही थोडे गुलाबी डाग पडेपर्यंत शिजू द्यावे. गरम गरम धिरडे लोणी व लोणचे किंव्हा केचप बरोबर वाढावे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा