मटारच्या करंज्या (५५-६० करंज्यांसाठी)
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
सहा वाट्या मटार मिक्सर मधे अर्धवट वाटून घ्यावेत. एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात २ टीस्पून मोहरी, १ टीस्पून हिंग, व १ टीस्पून हळद घालून फोडणी करावी. त्यात ६ टेबलस्पून तीळ घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावेत. ३ छोटे उकडलेले बटाटे बारीक फोडी करून घालावेत. त्यातच वाटलेले मटार घालावेत. सगळे हलवून चवीप्रमाणे मीठ व हिरवी मिर्चीची पेस्ट घालावी. ३ टीस्पून आमचूर घालून सगळे चांगले मिसळावे व २-३ वाफा आल्यावर गॅस बंद करावा.
बाहेरचे कवच करण्यासाठी ३ वाट्या कणीक घ्यावी. त्यात १/२ वाटी बेसन व १/२ वाटी तांदुळाची पिठी, चवी प्रमाणे मीठ, व १ टीस्पून हळद घालावी. त्यात ४ टेबलस्पून तेल गरम करून घालावे व पाण्याने घट्ट मळावे.
कणकेचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटाव्यात. प्रत्येक पुरीत सारण भरून ती मधे दुमडून बंद करावी. कड कातण्याने कापावी किंव्हा मुरड घालावी. अश्याप्रकारे सर्व करंज्या भरून झाल्यावर तेलात गुलाबी रंगावर तळून कढाव्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा