मुगाची उसळ :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१ वाटी हिरवे मूग स्वच्छ धुऊन घ्यावेत व १ & १/२ वाटी पाणी घालून कुकर मध्ये एक शिट्टी यॆईपर्यन्त शिजवावेत. एक शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करावा व ५ मिनिटांनी बंद करावा. एका पातेल्यात ४ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, व १ टीस्पून हळद घालावी. त्यावर शिजलेले मूग घालावेत. आवडीप्रमाणे पातळ करायला पाणी घालावे व २ टीस्पून काळा / गोडा मसाला, २ मोठ्या लसणाच्या पाकळ्या व २ हिरव्या मिरच्यांची पेस्ट, १ टीस्पून जिर्याची पूड, व चवीप्रमाणे मीठ घालावे. थोडी गोडसर चव आवडत असल्यास, १ छोटा गुळाचा खडा घालावा (मी १ टेबलस्पून गूळ घातला आहे). एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. व पोळी किंव्हा भाताबरोबर, वरून थोडे लिंबू पिळून, गरम गरम वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा