शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

खमंग काकडी / Khamang Kakdi

खमंग काकडी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)



१ काकडी, विळीने किंव्हा वर व्हीडिओत दिल्याप्रमाणे सुरीने, कोचून घ्यावी व हाताने पिळून त्यातील पाणी काढावे. कोचलेल्या काकडीत २ टेबलस्पून दाण्याचे कूट*२ टेबलस्पून मोड आलेली मटकी, व १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. चवीप्रमाणे मीठ२ टीस्पून लिंबाचा रस, व १ टीस्पून साखर घालावी. एका छोट्या कढईत १ &१/२  टीस्पून तेल गरम करावे व त्यात १ टीस्पून  जिरे१/४ टीस्पून हिंग, व एक हिरवी मिर्ची उभी चिरून घालावी. थोडेसे परतून गॅस बंद करावा. आता ही फोडणी कोशिंबिरीवर घालावी. सगळे मिसळून पोळी बरोबर वाढावी. 

*शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यावेत व मिक्सर मध्ये भरड दाळावेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा