शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

टोमॅटो-गाजर सूप / Tomato Gajar Soup

टोमॅटो-गाजर सूप :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)


६ मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्यावेत. १ गाजर धुऊन सालं काढून मोठे तुकडे करून घ्यावे. दोन्ही एका मायक्रोवेव-सेफ भांड्यात घालून त्यात १"दालचीनी७-८ काळे मिरे२ लवंगा१ वाटी पाणी, आणि १/४ कांदा मोठे तुकडे करून घालावा. झाकण ठेऊन ५ मिनिटे मायक्रोवेव मध्ये शिजवावे (वरील पदार्थ गॅस वर शिजविले तरी चालेल). मिक्सर मध्ये घालून सगळे एकजीव होईपर्यंत वाटावे.  एका पातेल्यात २ टेबलस्पून लोणी घालून त्यावर वरील टोमॅटो-गाजराचे मिश्रण ओतावे. त्यात १ वाटी पाणी४ टीस्पून साखर, व चवीप्रमाणे मीठ घालावे. गॅस बारीक करून एक उकळी आणावी. आवडत असल्यास वरून फ्रेश क्रीम घालावे व ब्रेड-क्रूटॉन्स बरोबर गरम गरम प्यायला द्यावे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा