शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

गोभीचे परोठे / Gobhiche Parothe

गोभीचे परोठे (२ जणांसाठी):


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

कणीक:  वाटी कणीक, १/२ टीस्पून मीठ, १ टीस्पून तेल, हे सर्व एकत्र मिसळावे. आता पाण्याने पोळ्यांच्या कणकेप्रमाणे कणीक भिजवावी. 

सारण: २ वाट्या फुलागोभी किसून घ्यावा. त्यात चवीप्रमाणे तिखट व मीठ घालावे. २ टीस्पून जिऱ्याची पूड व १ टीस्पून ओवा घालावा. सगळे एकत्र मिसळावे. 



कृती: कणकेचा २" मोठा गोळा घेऊन थोडा लाटून घ्यावा. त्यात ३ टेबलस्पून सारण घालावे. 

सगळीकडून बंद करून वरूनही तोंड बंद करावे. हातानी थोडे चपटे करून दोन्ही बाजूंस पीठ लाऊन त्याचा गोल १/२-३/४ सें.मी. जाड परोठा लाटावा.


गरम तव्यावर  १/४ चमचा तेल सोडून, दोन्ही बाजूंनी भाजावा. लोणी, दही व लोणच्याबरोबर गरम गरम खायला द्यावा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा