मुळ्याचे परोठे (२ जणांसाठी):
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. ३/४ वाटी किसलेला मुळा घेऊन, त्यात १ वाटी कणीक मिसळावी. त्यात १ टेबलस्पून बेसन (डाळीचे पीठ) मिसळावे. त्यातच १ टीस्पून हळद, १ टीस्पून ओवा, १ टेबलस्पून तेल, व चवीप्रमाणे तिखट व मीठ घालावे.
२. आता लागेल तेवढेच पाणी घालून कणीक मळावी. किसलेल्या मुळ्याला नंतर पाणी सुटते, त्यामुळे कणीक भिजविताना घट्टच ठेवावी.
३. भिजवून झाल्यावर वरून थोडा तेलाचा हात लावावा.
४. कणकेचा ३" गोळा घेऊन घडीच्या पोळ्याप्रमाणे, पीठ लाऊन, पण किंचित जाडसर लाटावे.
५. गरम तव्यावर दोन्ही बाजूंस १/४ टीस्पून तेल सोडून खमंग भाजावे.
६. लोणी, दही, व लोणच्याबरोबर खावयास द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा