शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

मटारचा परोठा / Matarcha Parotha

मटारचा परोठा :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

कणीक:  वाटी कणीक, १/२ टीस्पून मीठ, १ टीस्पून तेल, हे सर्व एकत्र मिसळावे. आता पाण्याने पोळ्यांच्या कणकेप्रमाणे कणीक भिजवावी.

सारण:


मिक्सर मध्ये किंचित भरड वाटलेले मटार २ वाट्या  घ्यावेत. त्यात २ टीस्पून लसणाची पेस्टआवडीप्रमाणे हिरवी मिरची किंव्हा तिखट व मीठ घालावे. १ टीस्पून बडीशेप मिक्सर मध्ये जाडसर वाटून त्यात मिसळावी. एका कढईत २ टेबलस्पून तेल घेऊन गरम करावे व वरील मिश्रण घालावे. मंद आचेवर थोडे कोरडे होईपर्यंत ५-७ मिनिटे परतावे. फ्रोझन मटार वापरल्यास थोडे जास्त परतायला लागेल कारण फ्रोझन मटारला जास्त पाणी सुटते. साराणातला ओलसरपणा जाऊन त्याचा हातानी गोळा करता यायला हवा. परतताना मधे मधे हलवावे, कढईला खाली लागू देऊ नये. योग्य प्रमाणात कोरडे झाल्यावर गॅस बंद करावा. 


कृती: कणकेचा २" गोळा घेऊन थोडा लाटून घ्यावा. त्यात ३ टेबलस्पून सारण घालावे. सगळीकडून बंद करून वरूनही तोंड बंद करावे. हातानी थोडे चपटे करून त्याचा गोल १/२-३/४ सें.मी. जाड परोठा लाटावा. गरम तव्यावर  १/४ चमचा तेल सोडून, दोन्ही बाजूंनी भाजावा. लोणी, दही व लोणच्याबरोबर गरम गरम खायला द्यावा.


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा