जास्तीचा उरलेला भात (१ वाटी) हाताने मोकळा करून घ्यावा. एका कढईत तेल गरम करून घ्यावे. एक वाटी भातासाठी २ टीस्पून तेल घ्यावे. १/2 टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, १/२ टीस्पून हळद, ५-६ कढिलिंबाची पाने घालून फोडणी करावी. १ &१/२ टेबलस्पून शेंगदाणे, व १ टेबलस्पून उडदाची डाळ घालावी व गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतावे. १ हिरवी मिर्ची उभी चिरून घालावी. १ छोटा कांदा बारीक चिरून घालावा व गुलाबी होईपर्यंत परतावा. गॅस बारीक करून मोकळा केलेला भात घालून, चांगले हलवावे व चवीप्रमाणे मीठ, व १/२ टीस्पून साखर घालून मिसळावे. १ मिनिट परतून गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व खायला द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा