भाज्या: १ वाटीफ्लॉवरच्या मोठ्या फोडी, १ वाटी डब्बू मिर्चीच्या मोठ्या फोडी, १ गाजर मोठे उभे कापून, १ वाटी फरसबी च्या शेंगा मोठ्या चिरून, व एक बटाटा मोठ्या फोडी करून, अश्या सर्व भाज्या चिरून तयार करून ठेवाव्यात.
ग्रेवी साठी: १ कांदा,२ टोमॅटो, ४-५ लसणाच्या पाकळ्या (किंव्हा १ टेबलस्पून लसणाची पेस्ट), व २" आलं, सर्व एकत्र मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.
कृती: एका कढईत३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात वरील ग्रेवी घालावी. थोडे परतून त्यातच १ &१/२ टेबलस्पून गरम मसाला, व चवीप्रमाणे लाल तिखट घालावे. सगळीकडून तेल सुटेपर्यंत चांगले परतावे. आता त्यावर गाजर, बटाटा, व फरसबीच्या फोडी टाकाव्यात व १/२ वाटी पाणी घालून झाकण ठेवावे. अंदाजे ५ मिनिटे सगळ्या फोडी अर्धवट शिजल्यावर, फ्लॉवर व डब्बू मिर्चीच्या फोडी घालाव्यात. चवीप्रमाणे मीठ घालून १/४ वाटी पाणी घालावे. झाकण ठेऊन सगळ्या भाज्या पूर्ण शिजू द्याव्यात. २ टेबलस्पून लिंबाचा रस घालावा व सर्व हलकेच मिसळून गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गरम गरम जलफ्रेझी पोळी किंव्हा फुलक्याबरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा