गोड शंकरपाळ्या
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१ वाटी दूध, १ & १/२ वाटी साखर , व १ वाटी पातळ तूप, हे सर्व एकत्र करून उकळायला ठेवावे. कोमट झाल्यावर त्यात १ टेबलस्पून बेसन, १ टीस्पून रवा, चिमूटभर हिंग, व मावेल इतका मैदा घालून घट्ट मळावे.
आता ह्या कणकेचा पोळी इतके मोठे गोळे (अंदाजे ३")करून घ्यावेत. एक गोळा घेऊन घेउन गोल जाडसर(१/२ cm जाड) पोळी लाटावी. कातण्याने चौकोनी काप करावेत. एका कढईत तेल गरम करून, सर्व काप मंद आचेवर, हलक्या गुलाबी रंगावर तळून काढावेत. असेच सर्व गोळ्यांबरोबर करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा