हिरव्या मिरच्यांचे लोणचे
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
२० मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या कराव्यात व त्याचे साधारण १ सें मी. लांबीचे तुकडे करून घ्यावेत. एका छोट्या कढईत १ टीस्पून तेल गरम करून त्यात २ टीस्पून मेथ्या गुलाबी रंगावर परतून घ्याव्यात. तळलेल्या मेथ्या, २ टीस्पून हळद, २ टीस्पून हिंग, व २ टेबलस्पून मोहरीची डाळ, हे सर्व लागेल तसे थोडे थोडे पाणी (एकूण अंदाजे १/२ वाटी पाणी) घालून थोडी भरड पेस्ट करून घ्यावी. चिरून ठेवलेल्या मिर्च्यांना तेलाचा हात लावावा किंव्हा सर्व मिर्च्यांवर पसरेल इतका तेलाचा स्प्रे मारावा. सर्व मिर्च्यांचे एकसारखे ५ भाग करून, त्यातील एका भागा एवढे मीठ घालावे. वर बनवलेली मोहरीच्या डाळीची पेस्ट घालावी व सर्व चांगले मिसळावे. आवडत असल्यास वरून अर्ध्या लिंबाचा रस पिळावा व शक्यतो काचेच्या बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे वर्षभर सुद्धा टिकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा