शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

गवारीची भाजी / Gawarichi bhaji

गवारीची भाजी :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

२ वाट्या गवार, शिरा काढून निवडून, हाताने मोडून घ्यावी व पाण्याने स्वच्छ धुआवी. २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून मोहरीचिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालून फोडणी करावी. एक छोटा बटाटा फोडी करून फोडणीत घालावा. थोडे परतून, त्यावर गवार टाकावी. चवीप्रमाणे मीठ, तिखट२ टीस्पून काळा/ गोड मसाला, व १ टेबलस्पून गूळ घालून सारखे करावे. १/४ वाटी पाणी घालावे व  मध्यम आचेवर झाकून शिजवावे. ४-५ मिनिटांनी हलवावे व जरूर वाटल्यास आणखीन थोडे पाणी घालावे. आवडत असल्यास १ टेबलस्पून दाण्याचे कूट* घालावे. झाकण ठेऊन भाजी पूर्ण शिजू द्यावी व मग गॅस बंद करावा.  

*शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यावेत व मिक्सर मध्ये भरड दळावेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा