४ मोठ्या वाट्या (३२ औंस / १ लिटर ) दही एका स्वच्छ सुती कापडात बांधावे व टांगून ठेवावे. साधारण ३-४ तासात दह्यातील पाणी निघून गेल्यावर, तयार झालेला चक्का काढावा. (श्रीखंड थोडे घट्ट हवे असल्यास, पाणी निथळल्यानंतर बांधलेल्या चक्क्यावर जड वजन ठेवावे. त्यामुळे आणखीन थोडे पाणी निघून चक्का घट्ट होईल). एका वाटीत १ टीस्पून दूध घेऊन त्यात १/४ टीस्पून केशर भिजवून ठेवावे. चक्क्यामधे, चक्क्या एवढीच साखर, व दुधात भिजविलेले केशर घालावे. थोडा केशरी पिवळा खायचा रंग, व आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूडघालून चांगले फेटून घ्यावे. एका बारीक चाळणीत ओतून चमच्याने फेटत, किंव्हा पुरणयंत्रातून, गाळून काढावे व डब्यात भरून ठेवावे. वाढायच्या वेळी, आवडत असल्यास वरूनचारोळ्या किंव्हा भिजवलेले बदाम सालं काढून व काप करून घालावेत. श्रीखंड जेवणात पुरी बरोबर खायला फार चविष्ट लागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा