१/२ वाटी राजमा ५-६ तास भिजत टाकावा. लवकर हवे असल्यास, उकळत्या पाण्यात भिजत घालून झाकून ठेवावे. मग तासाभरात सुद्धा राजमा चांगला भिजतो. आता प्रेशर कुकर मध्ये उकडायला ठेवावे. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस १/२ तास बारीक करून ठेवावा. कुकर गार झाल्यावर राजमा बाहेर काढावा.
ग्रेवी साठी: १ छोटा कांदा, १ टोमॅटो, १" आलं, व ४ लसणाच्या पाकळ्या, सर्व एकत्र मिक्सर मधून वाटून घ्यावे.
कृती: एका पातेल्यात १ &१/२ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात वर बनविलेली ग्रेवी घालावी व २ टीस्पून राजमा मसाला किंव्हा गरम मसाला घालून परतावी. सगळीकडून तेल सुटायला लागेपर्यंत परतावे. मग उकडलेला राजमा त्यात घालुन सर्व मिसळावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. आणखीन रस हवा असल्यास हवे तेवढे पाणी घालावे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा व पोळी, फुलका,किंव्हा भाताबरोबर खायला द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा