शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

भेळ सलाद / Bhel Salad

भेळ सलाद:

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

आइसबर्ग लेट्यूसचे मोठे चौकोनी काप २ वाट्या१ मोठी काकडी साल काढून मोठे तुकडे करून१/२ कांदा बारीक चिरून१ टोमॅटो बारीक फोडी करून, आणखीन कुठल्याही प्रकारची सलादची पाने स्वच्छ धुऊन व मोठे तुकडे करून, १/४ लाल व पिवळी डब्बू मिर्ची बारीक चिरून, सर्व एकत्र मिसळावे. १/२ वाटी कुठल्याही प्रकारचे फरसाण/चिवडा/भेळ-मिक्स घालावे. २ टेबलस्पून चिंचगुळाची गोड चटणी घालावी. १/२ टीस्पून चाट मसाला घालावा व सर्व चांगले मिसळावे. वरून थोडी बारीक शेव व बारीक चिरून कोथिंबीर घालावी. सलादची पाने व फरसाण कुरकुरीत असतानाच लगेच खायला द्यावे. वाढायला थोडा वेळ असल्यास, ओली चटणी  व फरसाण मात्र ऐन वेळेस घालावे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा