कोबीची कोशिंबीर :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१ मोठी वाटी (८ औंस) कोबी बारीक चिरून घ्यावा. त्यात १ &१/२ टेबलस्पून दाण्याचे कूट*, चवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून साखर, व १ टीस्पून लिम्बाचा रस घालावा. एका छोट्या कढईत १ टीस्पून तेल गरम करून घ्यावे व त्यात १/२ टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, व १ हिरवी मिर्ची उभी चिरून घालावी. ही फोडणी चिरलेल्या कोबीवर घालावी व सर्व चांगले मिसळावे. आवडत असल्यास वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
*शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यावेत व मिक्सर मध्ये भरड दळावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा