शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

कोबीची भाजी / Kobichi Bhaji

कोबीची भाजी :



(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

२ वाट्या कोबी उभी-उभी बारीक चिरून घ्यावी. १/२ वाटी मटारचे दाणे ३ मिनिटांसाठी एका मायक्रोवेव-सेफ भांड्यात झाकण ठेऊन शिजवून घ्यावेत. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग१/२ टीस्पून हळद, व २ हिरव्या मिर्च्या उभ्या चिरून घालाव्यात. त्यावर चिरलेली कोबी घालून सगळे मिसळावे. आता गॅस बारीक करून झाकण ठेवावे व ५ मिनिटे शिजू द्यावे. ५ मिनिटांनी शिजलेले मटार घालून परत झाकण ठेऊन कोबी मऊ होईपर्यंत शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ१/२ टीस्पून साखर१/४ टीस्पून धन्याची पूड, व १/४ टीस्पून जिऱ्याची पूड घालून झाकण न ठेवता एखादा मिनिट शिजू द्यावे. व मग गॅस बंद करावा. कोबीची भाजी गरम पोळी बरोबर वाढावी. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा