शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

ब्रेड पकोडा (ब्रेडची भजी) / Bread Pakora

ब्रेड पकोडा (ब्रेडची भजी) :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. ब्रेडच्या दोन स्लाइसेस घेऊन प्रत्येक स्लाइसचे ४ त्रिकोणी काप करावेत. 

२. २ मध्यम आकाराचे बटाटे घेऊन सोलावेत व कुस्करून घ्यावेत. त्यात चवीप्रमाणे मीठ व १/४ टीस्पून तिखट घालून सगळे मिसळावे. 

३. ब्रेडच्या प्रत्येक त्रिकोणाला एका बाजूस बटाट्याचा एक पातळ थर लावावा. 

४. १ वाटी डाळीचे पीठ (बेसन) घेऊन त्यात १ टेबलस्पून तांदुळाची पिठी घालावी. त्यात चवीप्रमाणे मीठ१/४ टीस्पून ओवा, आणि एक चिमूटभर बेकिंग सोडा घालून पाण्यात कालवावे. तयार पीठ दाटसर असावे. गोळे होऊ देऊ नयेत. पीठ हाताने एकसारखे पण भराभर गोलगोल फेटावे. 

५. एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करावे. ब्रेडचा एक त्रिकोण घेऊन तो पिठात बुडवावा, व सगळीकडून पीठ लागल्यावर तेलात सोडावा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळावा व एका पेपर टॉवेल वर काढावा. असेच सगळ्या त्रीकोणांबरोबर करावे. थोडा चाट मसाला शिंपडून, केचप बरोबर गरम गरम ब्रेड पकोडा खायला द्यावा.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा