शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

बटाटा-मटार ग्रिल्ड सँडविच / Batata Matar Grilled Sandwich

बटाटा-मटार ग्रिल्ड सँडविच :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

सारण : 

१. दोन उकडलेले बटाटे सोलून बारीक चिरून घ्यावेत. 

२. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात एक चीमूटभर हिंग१/२ टीस्पून हळद३-४ कढीलिंबाची पाने बारीक चिरून२ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा१/४ टीस्पून आल्याची पेस्ट१/२ टीस्पून लसणाची पेस्ट, व १/२ टीस्पून गरम मसाला घालून चांगले परतावे. 


३. त्यात चिरलेला बटाटा, व १/२ वाटी भरड वाटलेले मटार घालून सगळे मिसळावे. 

४. गॅस बारीक करून १/४ टीस्पून आमचूर, व चवीप्रमाणे मीठ व तिखट घालावे. सर्व मिसळून एका मिनिटानी गॅस बंद करावा. 


कृती: 

१. २ ब्रेडच्या स्लाइसेस घेऊन दोन्हीवर लोणी लाऊन घ्यावे. 

२. वरील सारणाचा अंदाजे १/२ सें. मी. जाड थर एका स्लाइस वर पसरावा. आता दुसरी स्लाइस वर ठेवावी. अश्या प्रकारे सर्व सँडविचेस तयार करून घ्यावेत. 


३. सँडविचला दोन्ही बाहेरच्या बाजूंस थोडे थोडे लोणी लाऊन एका ग्रिल टोस्टर किंव्हा गॅस टोस्टर मधे ग्रिल करावे. 

४. गरम गरम सँडविच केचप बरोबर खायला द्यावे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा