मसाला लावलेले पोहे :
( सामग्री रेखांकित केली आहे)
१ मोठी वाटी पातळ पोहे मायक्रोवेव मध्ये १ मिनिट गरम व कुरकुरीत करून घ्यावेत (१ मिनिट ही वेळ अंदाजाने दिली आहे, प्रयेक मायक्रोवेव च्या ताकदीनुसार वेळ बदलावी). एका छोट्या वाटीत १ टेबलस्पून तेल घेऊन त्यात २ टीस्पून काळा मसाला / गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ, व १/२ टीस्पून तिखट घालून मिसळावे. हा मसाला पोह्यांना लावावा व त्यात १/२ कांदा बारीक चिरून, व १/४ टोमॅटो बारीक चिरून घालावा. सगळे मिसळावे व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खायला द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा