पिठाच्या पिल्लांची चटणी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), १ टीस्पून जाड बेसन (किंव्हा १ टीस्पून तांदुळाची पिठी), चवीप्रमाणे मीठ, व १ चिमूटभर खायचा सोडा, हे सर्व एकत्र मिसळावे. एका हाताने पाणी घालीत दुसऱ्या हाताने पिठातले गोळे मोडत पीठ कालवावे. खूप पातळ किंव्हा खूप घट्ट करू नये. बोटांवरून घसरेल इतपत पातळ असावे. कढईत तळण्यासाठी तेल गरम करून त्यात हाताने सगळीकडे पसरून पीठ घालावे. गुलाबी होईपर्यंत तळावे. वरील मापाने साधारण ३-४ टेबलस्पून पिठाची पिल्ले बनतील.
पिल्लांमध्ये १ टीस्पून लसणाची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ (पिठात आधीपासूनच मीठ आहे हे लक्षात ठेवावे), व अंदाजे ३ टीस्पून तिखट (आवडीप्रमाणे कमी जास्त करावे. शक्यतो ही चटणी झणझणीत असते) घालून भरड वाटावे. ही चटणी बहुतेक करून वडा-पाव मध्ये वापरली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा