शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

आलू-मेथी / Aloo Methi

आलू-मेथी :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

२ मध्यम आकाराच्या बटाट्यांचे  साधारण १" मोठे  काप करून घ्यावेत. २ मोठ्या वाट्या मेथी स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून जिरेचिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी. त्यात बटाट्यांचे काप घालावेत व कड गुलाबी दिसेपर्यंत परतावे. आता झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्यावे. बटाटे अंदाजे ८०% पर्यंत शिजले, की त्यात चिरलेली मेथी घालावी. चवीप्रमाणे मीठ१ टीस्पून सब्झी मसाला किंव्हा १ टीस्पून चाट मसाला, व  १/२ टीस्पून तिखट घालावे व सगळे मिसळून परत १ मिनिट झाकण ठेऊन राहिलेले बटाटे व मेथी शिजू द्यावी. आता गॅस बारीक करून झाकण न ठेवता भाजीचा ओलसरपणा जाईपर्यंत परतावे. गरम गरम पोळी किंव्हा फुलक्याबरोबर खायला द्यावे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा