डाळ-पालक :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. १ वाटी (८ औंस) तुरीची डाळ प्रेशर कुकर मध्ये दोन वाट्या पाणी घालून, ३ शिट्ट्या येईपर्यंत शिजवावी. ३ शिट्ट्या आल्यावर गॅस ५ मिनिटे बारीक करून ठेवावा. गार झाल्यावर डाळ बाहेर काढावी व एका रवीने घुसळून सारखी करावी.
२. १ वाटी पालकाची पाने स्वच्छ धुउन बारीक चिरून घ्यावीत. ४ लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे करावेत.
३. एका पातेल्यात, ४ टीस्पून तेल गरम करून घ्यावे. त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर १ टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १ टीस्पून हळद, ४-५ कढिलिंबाची पाने, व २ वाळलेल्या लाल मिरच्या दोन तुकडे करून, घालाव्यात.
४. आता त्यावर चिरलेला पालक घालून गॅस बारीक करावा व एखदा मिनिट परतावे.
५. त्यात शिजलेली डाळ व लागेल तसे पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ घालून वरून १ टोमॅटो बारीक चिरून घालावा.
६. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम पोळी/ फुलका किंव्हा भाताबरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा