शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

आंब्याचा शिरा / Ambyacha Shira

आंब्याचा शिरा (६-७ जणांसाठी ) :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)


एका पातेल्यात १ & १/२ वाटी आंब्याचा रस व १ &१/२ वाटी पाणी मिसळून, मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे, व मधे मधे ढवळावे. अधण आल्यावर गॅस बंद करावा. एका वाटीत १/४ वाटी गरम पाणी घेऊन त्यात ७-८ बदाम भिजत घालावेत. साधारण १/२ तासानंतर  त्यांची सालं काढावीत व उभे पातळ  काप करावेत. एका कढईत ३ टेबलस्पून तूप घेउन त्यात १ &१/२ वाटी रवा भाजायला घ्यावा. मध्यम आचेवर किंचित गुलाबी व्हायला लागताच त्यावर अधण आलेला आंब्यांचा-रस-पाणी हे मिश्रण घालावे. चांगले मिसळून त्यात १ &१/४ वाटी साखर घालावी व झाकण ठेऊन, अगदी बारीक आचेवर १ मिनिट शिजू द्यावे. १/४ टीस्पून वेलदोड्याची पूड घालावी व कडेने  टीस्पून तूप सोडावे. परत सगळे हलवून २ मिनिटे झाकण ठेऊन शिजवावे. गॅस बंद करावा व वरून बदामाचे काप घालून गरम गरम खायला द्यावे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा