कणीक: १ वाटी कणीक, १/२ टीस्पून मीठ, १ टीस्पून तेल, हे सर्व एकत्र मिसळावे व त्यात ३/४ वाटी चिरलेला पालक किंव्हा चिरलेली मेथी किंव्हा कुठलीही पालेभाजी घालावी. आता पाण्याने कणीक पोळ्यांच्या कणकेप्रमाणे भिजवावी.
सारण:
२ मोठे बटाटे उकडून साले काढून कुस्करावेत. त्यात एक छोटा बारीक चिरलेला कांदा, १ टीस्पून लसणाची पेस्ट, एक टीस्पून आल्याची पेस्ट, २ छोट्या हिरव्या मिर्च्याच्यांची पेस्टकिंव्हा चवीप्रमाणे लाल तिखट, व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व चांगले कालवावे.
कृती: कणकेचा अंदाजे २" मोठा गोळा घ्यावा व हाताने दाबून थोडा चपटा व मोठा करावा. कणकेपेक्षा दीडपट सारणाचा गोळा घेऊन तो कणकेच्या गोलात भरावा. सगळीकडून गुंडाळून वरून तोंड बंद करावे. हाताने थोडे दाबून, दोन्ही बाजूंनी थोडी कणीक लावावी व पोळपाटावर जाडसर (१/२ सें.मी. जाड) लाटावे. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी १/४ टीस्पून तेल पसरून खमंग भाजावे व वरून लोणी घालून, दही व कुठल्याही लोणच्याबरोबर खावयास द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा