शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

वडा-पाव / Wada Pav

वडा-पाव :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

बटाटे वडे व पाव तयार ठेवावेत. एक पाव घेऊन तो आडवा दोन भागात कापावा. दोन्ही भाग दोन्ही बाजूंनी गरम तव्यावर भाजून घ्यावेत. आता एका भागाला आतल्या बाजूस चिंचगुळाची गोड चटणी व दुसऱ्या भागाच्या आतील भागास पिठाच्या पिल्लांची चटणी लावावी. कुठल्याही एका भागावर एक वडा ठेवावा व हाताने थोडा दाबून चपटा करावा. त्यावर दुसरा पावाचा भाग ठेऊन गरम वडा-पाव खायला द्यावा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा