शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

झटपट चकोल्या / Jhatpat Chakolya

झटपट चकोल्या :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

जास्तीच्या २ पोळ्या घेऊन, हाताने त्यांचे १"x १" मोठे तुकडे करून घ्यावेत. एका कढईत  २ टीस्पून तेल गरम करावे व त्यात  १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग१/२ टीस्पून हळद, व ३-४ काढिलिंबाची पाने घालावीत. १ & १/४ वाटी पाणी घालून त्यात चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट१ & १/२ टीस्पून काळा मसाला/गोड मसाला, १ टीस्पून लिंबाचा रस, व १/४ वाटी तुरीच्या डाळीचे वरण (पर्यायी) घालून उकळी आणावी. वरून बारीक चिरून कोथिंबीर घालून गरम गरम खायला द्यावे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा