शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

दलिया / Dalia

दलिया (दोघांसाठी):



दलिया (दोघांसाठी):

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे

एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करायला ठेवावे. गरम झाल्यावर त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी व तडतडू द्यावी. मग त्यात १/२ टीस्पून जिरे१/४ टीस्पून हिंग१/२-१ टीस्पून हळद, व १ उभी चिरलेली मिर्ची घालावी. त्यात ४-५ कढीलिंबाची पाने, व २ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा घालावा. एक मिनिट परतून त्यात १ & ३/४ वाटी पाणी घालावे. त्यात २ टेबलस्पून गाजराचे मोठे तुकडे, २ टेबलस्पून मटारचे दाणे, व २ टेबलस्पून प्रत्येकी बारीक चिरलेली हिरवी व लाल डब्बू मिर्ची घालावी. त्यात १/२ वाटी (४ औंस) दलिया घालावा. सर्व मिसळून त्यात चवीप्रमाणे मीठ१/२ टीस्पून लिंबाचा रस , व १/२ टीस्पून साखर घालावी. सगळ्याला उकळी येऊ द्यावी व दलियाच्या पातळीपर्यंत पाणी आल्यावर गॅस बारीक करावा व झाकण ठेऊन पाणी संपेपर्यंत, मधे मधे हलवत शिजू द्यावे. मग गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गरम गरम दलिया खायला द्यावा. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा