पन्हं
(सर्वे सामग्री रेखांकित केली आहे)
एक मोठी कैरी साल काढून किंव्हा सालासकट कुकर मध्ये एक शिट्टी यॆईपर्यन्त उकडावी. उकडून थोडे गार झाल्यावर त्याचा गर हाताने कोळून काढून घ्यावा. कैरी कमी आंबट असल्यास तेवढाच, किंव्हा जास्त आंबट असल्यास त्यात गराच्या दीड पटीने गूळ किंव्हा साखर घालावी. गूळ किंव्हा साखर मिसळेपर्यंत हलवावे आणि डब्यात भरून ठेवावे. हे मिश्रण फ्रीजमध्ये खूप दिवस टिकते. त्यात पाहिजे तेंव्हा पाणी व थोडे मीठ घालून प्यावयास द्यावे. साधारण एक ग्लास पन्ह्यासाठी १टेबलस्पून मिश्रण, १/४ टीस्पून मीठ व पाउण ग्लास गार पाणी लागते. हे महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यातील आवडीचे पेय आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा