शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

तुरीच्या डाळीची खिचडी / Toor dal khichadi

तुरीच्या  डाळीची खिचडी 

(सामग्री रेखांकित केली आहे)


एक वाटी तांदूळ व अर्धा कप तुरीची डाळ पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावी. एका पातेल्यात १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद व  ४-५ कढीपत्त्याची  पाने, ह्याची फोडणी करावी. त्यात १ & १/२ टेबलस्पून कच्चे दाणे घालावेत व २ मिनिटे परतावे. त्यातच २ लाल मिर्च्या मधे अर्ध्या तोडूनउभा चिरलेला एक छोटा कांदा व २ टीस्पून बारीक कापलेल्या लसणाच्या पाकळ्या घालाव्यात. थोडे परतल्यावर, धुतलेले डाळ व तांदूळ घालावेत. त्यावर ३ वाट्या पाणी घालावे. (खिचडी मऊसर आवडत असल्यास पाणी थोडे जास्त घालावे). एका टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालाव्यात. त्यात चवीप्रमाणे मीठ व १/२ टीस्पून मिरपूड घालावी. पाण्याला उकळी आल्यावर पातेले कुकर मध्ये ठेऊन, एक शिट्टी यॆईपर्यन्त शिजवावे. मग ५ मिनिटे गस बारीक ठेऊन बंद करावा. ही खिचडी डायरेक्ट कुकर मधेच केली तरी चालते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा