हिरव्या टोमॅटोची चटणी
(सामग्री रेखांकित केली आहे)
४ मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो फोडी करून घ्यावेत. एका कढईत २ टेबलस्पून तेल घालून गरम करावे. गरम तेलात चवीप्रमाणे हिरवी मिरची व २ टीस्पून कढीलिंब ह्याची पेस्ट करून घालावी. थोडे परतून, टोमॅटोच्या फोडी टाकून हलवावे. दीड चमचा भाजलेल्या तिळाची पूड व २ टीस्पून साखर टाकावी. (टोमॅटो जास्त आंबट असल्यास साखर जास्त घालायला हरकत नाही). फोडी पूर्ण विरघळेपर्यंत मंद विस्तवावर परतावे. चवीप्रमाणे मीठ घालावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा