शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

भरली मिर्ची / Bharli Mirchi

भरली मिर्ची:


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

1. अंदाजे ७-८ जाड हिरव्या मिर्च्या स्वच्छ धुऊन पुसून घ्याव्यात व सर्व मिर्च्यांना उभी चीर पाडावी ज्यामुळे त्यांत मसाला भरता येईल. एका सुरीने आतल्या सर्व बिया काढून टाकाव्यात. 


2. मसाल्यासाठी, १ वाटी  डाळीचे पीठ (बेसन) घ्यावे. त्यात चवीप्रमाणे मीठ व तिखट, 3 टीस्पून धन्याची पूड, २ टीस्पून जिऱ्याची पूड, व २ & १/२ टीस्पून आमचूर घालून मिसळावे. हा मसाला प्रत्येक मिर्चीत अंदाजे १ टेबलस्पून भरावा. 


३. एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात ३-४ मसाला भरलेल्या मिर्च्या घालाव्यात. सगळीकडून तेल लागेल असे हलक्या हाताने थोड्या परताव्यात. 


४. १ मिनिट तेलावर परतून गॅस बारीक करावा. वर झाकण ठेवावे व दर ४-५ मिनिटांनी मिर्च्या थोड्या थोड्या फिरवून सगळीकडून पूर्ण शिजू द्याव्यात. 



५. वरून १ टेबलस्पून दाण्याचे कूट* शिंपडावे व झाकण ठेऊन एखादा मिनिट आणखीन  शिजू द्यावे. आता हलक्या हाताने सर्व मिर्च्या एका ताठलीत काढाव्यात. 


६. आता उरलेल्या ३-४ मिरच्या ही, कढईत लागेल तेवढे आणखीन तेल घालून, अश्याच पद्धतीने शिजवाव्यात व गरम गरमच पोळी बरोबर खायला द्याव्यात. 




*शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यावेत व मिक्सर मध्ये भरड दळावेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा