शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

माझी आई

माझी आई


आई या विषयावरती

कविता झाल्या अनेक 

व्याक्ति वैशिष्ट्ये अनेक परंतु
माया तीच एक 

आई आमची लहानपणी 
अतीत साताऱ्यात वाढली 
लग्न झाल्यावर तिचे थेट 
दिल्लीस जाऊन पोचली 
आई वडिलांस तिच्या 
सोडूनि लांब आली
परप्रांतीय जागेत सुद्धा 
मराठी संस्कृती जपली 

वांग्याची भाजी भाकरी व 
आमटीचा सुटे खाट 
झुणका भाकर लसणाची चटणी 
अस्सल मराठी पदार्थ जेवणात 


एकटी असून सुद्धा 

अनेक माणसे जोडली 

तीन मुलांना सांभाळून 
हिंदी बोलावयास शिकली 

आम्हास शिवले नवीन कपडे
करुनि विणकाम, भरतकाम आणि शिवण 
सासू बाईंच्या हाताखाली
स्वयंपाकातही झाली निपुण 
मंडळातल्या स्पर्धेत बनविले 
क्लिष्ट पदार्थ सुरेख 
कौतुक साऱ्यांचे मिळवून 
बक्षिसे मिळविली अनेक 



शिस्त आम्हास लाविली 

कष्टाने कर्तव्ये पाळण्याची 

सत्कारणी लावावा दिवस, म्हणे ती 
त्यानेच शांत झोप मिळे रात्रीची 
संसार करावा काटकसरीने 
प्रेम असावे निरपेक्ष 
जोडीदाराची सेवा करुनी 

दाखविले तिने प्रत्यक्ष 


हिच्याच शिकवणींमुळे सासरी 

कौतुक माझे झाले 
कौशल्य सारे शिक्षकाचे 

परि गूण शिष्यालाच मिळाले 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा