पंजाबी भेंडी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
पाव किलो (१५-२०) भेंड्या स्वच्छ धुऊन व पुसून घ्याव्यात. प्रत्येक भेंडीचे १" लांब काप करावेत. एका कढईत ३ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, आणि १/४ टीस्पून हळद घालावी. त्यातच १ छोटा कांदा पातळ व उभा उभा चिरून घालावा व किंचित गुलाबी होईपर्यंत परतावा. आता भेंड्यांचे तुकडे घालून भेंड्या मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर परताव्यात. चवीप्रमाणे मीठ व तिखट घालावे, व १/2 टीस्पून आमचूर घालून सर्व मिसळावे. थोडेसे परतून गॅस बंद करावा. ही चटपटीत पंजाबी भेंडी पोळी किंव्हा फुलक्याबरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा