शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

टोमॅटोची आमटी / Tomato Amti

टोमॅटोची आमटी :



(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ वाटी तुरीची डाळ धुऊन घ्यावी व त्यात  वाट्या पाणी घालून कुकर मधे ३ शिट्ट्या येईपर्यंत शिजवावी. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस ५ मिनिटांसाठी बारीक करावा व मग बंद करावा. कुकर गार झाल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढावी व रवीने चांगली घुसळावी. 

२. एका पातेल्यात ४ टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर १ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून पेक्षा कमी हिंग१ टीस्पून हळद१०-१२ मेथी चे दाणे५-६ कढिलिंबाची पाने२ हिरव्या मिर्च्या उभ्या चिरून, व २ टोमॅटोंचे २ सें. मी. मोठे तुकडे, घालावेत. १ मिनिट परतावे. 

३. आता त्यात तुरीची डाळ घालावी व आवडीप्रमाणे पाणी घालून पातळ करावी. महाराष्ट्रीय जेवणातील आमटी, कुठल्याही उत्तर भारतीय जेवणातील डाळीपेक्षा पातळ असते.  

४. आमटीत ४ टीस्पून काळा/गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ, व १ टेबलस्पून गूळ घालावा. 

५. गॅस मध्यम आचेवर ठेऊन एक उकळी येऊ द्यावी. एखादा मिनिट तसेच उकळू द्यावे व मग गॅस बंद करावा. 

६. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गरम गरम आमटी पोळी-भाजी किंव्हा भाताबरोबर वाढावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा