शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

नारळी भात / Narali Bhat

नारळी भात

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे )

एका पातेल्यात ३ टीस्पून तूप गरम करावे. त्यात ३ लवंगा व दीड वाटी  धुतलेले तांदूळ  घालून थोडे परतावे. त्यात ३ वाट्या पाणी व १/४ चमचा केशर घालून थोडा खायचा केशरी रंग घालावा. आता तांदूळ मोकळे शिजवून घ्यावेत. शिजलेले तांदूळ एका ताटामध्ये गार करण्यासाठी पसरून ठेवावेत. आता त्याच पातेल्यात १ & ३/४ वाटी गूळ  घ्यावा व त्यात गार झालेला भात घालावा. वेलदोड्याची पूड, व थोडे बेदाणे घालावॆत. त्यात १/२ वाटी खवलेला नारळ घालावा. वरून एक चमचा (१ टीस्पून) तूप सोडावे. सर्व मिसळून तेच पातेले कुकर मध्ये ठेऊन एक शिट्टी आल्यावर गॅस बंद करावा. खायला देताना वरून काजू/ बदामाचे काप घालवेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा