साखर भात (गोड भात, केशर भात)
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे )
एका पातेल्यात ३ टीस्पून तूप गरम करावे. त्यात ३ लवंगा टाकून १ & १/२ वाटी धुतलेले तांदूळ घालावेत. थोडे परतल्यावर त्यात ३ वाट्या पाणी घालून थोडा खायचा केशरी रंग व १/४ टीस्पून केशर घालावे. आता तांदूळ मोकळे शिजवून घ्यावेत. शिजलेले तांदूळ एका ताटामध्ये गार करण्यासाठी पसरून ठेवावेत. आता त्याच पातेल्यात १ & १/२ वाटी साखर घेऊन एक तारी पाक* करून घ्यावा. त्यात गार झालेला भात घालावा. वेलदोड्याची पूड, व थोडे बेदाणे घालावॆत. वरून एक चमचा (१ टीस्पून) तूप सोडावे. तेच पातेले कुकर मध्ये ठेऊन एक शिट्टी आल्यावर गॅस बंद करावा. खायला देताना वरून काजू/ बदामाचे काप घालवेत.
* एक तारी साखरेचा पाक: एका पातेल्यात साखर व ती बुडेपर्यंत पाणी घालून उकळायला ठेवावे. मधे मधे ढवळत राहावे. उकळी आल्यावर साधारण २-३ मिनिटांनी दोन बोटांमध्ये पाकाचा एक थेंब घेउन त्याचा चिकटपणा पडताळून बघावा. जेंव्हा बोटांमध्ये पाकाची व्यवस्थित एक तार दिसू लागेल, तेंव्हा गॅस बंद करावा. ह्याला एक तारी पाक असे म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा