शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

फोडणीची पोळी/ फोडणीचा ब्रेड / Fodnichi Poli / Fodnicha Bread

फोडणीची पोळी/ फोडणीचा ब्रेड (२ जणांसाठी):


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

उरलेली जास्तीची पोळी** मिक्सर मध्ये भरड कुस्करून घ्यावी. २ पोळ्यांसाठी* १ टेबलस्पून तेल एका कढईत गरम करून घ्यावे. त्यात १/२ टीस्पून मोहरीचिमूटभर हिंग१/२ टीस्पून हळद, व ४-५ कढिलिंबाची पाने घालून फोडणी करावी. त्यात १ हिरवी मिर्ची उभी चिरून, व ८-१० कच्चे शेंगदाणे घालावेत. दाणे किंचित गुलाबी झाल्यावर एक छोटा कांदा बारीक चिरून, त्यात घालावा.  थोडा परतून त्यात कुस्करलेली पोळी घालावी व गॅस बारीक करावा. चवीप्रमाणे मीठ व थोडे तिखट घालावे. १ बारीक चिरलेला टोमॅटो व १ टीस्पून  साखर घालावी. २ टीस्पून लिंबाचा रस घालून चांगले हलवावे व २ मिनिटांनी गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक शेव घालून गरम खावयास द्यावे.  

*जर पोळी थोडी कमी असेल तर भरीला ब्रेड कुस्करून घातला तरी चालेल. 

**पोळीच्या ऐवजी उरलेल्या ब्रेडचा 'फोडणीचा ब्रेड' असाच बनवावा. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा