टोमॅटो चटणी
(सामग्री रेखांकित केली आहे)
४ मध्यम आकाराचे टोमॅटो फोडी करून घ्यावेत. एका काढईत १ & १/२ टेबलस्पून तेल घालून गरम करावे. गरम तेलात ४ लवंगा, १/४ टीस्पून मिरे व १ इंच दालचीनीचा तुकडा घालून थोडे परतावे. त्यात चवीप्रमाणे तिखट व २ टीस्पून साखर घालावी व लगेच टोमॅटोच्या फोडी घालून हलवावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. फोडी पूर्ण मऊ होईपर्यंत, मध्यम आचेवर परतावे. कुठल्याही परोठ्याबरोबर किंव्हा पोळीबरोबर ही चटणी वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा