शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

डाळ-मेथी (प्रकार १) / Dal Methi

डाळ-मेथी (प्रकार १) :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१ वाटी तूर डाळ, २ वाट्या पाणी घालून कुकर मधे शिजवावी. एक शिट्टी आल्यावर गॅस बारीक करावा व पाच मिनिटांनी बंद करावा. गार झाल्यावर, डाळ बाहेर काढावी व रवीने चांगली घुसळावी. एका पातेल्यात ४ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १ टीस्पून जिरे१/४ टीस्पून हिंग१ टीस्पून हळद, व १ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण घालावा. लसूण गुलाबी होईपर्यंत परतावे. आता त्यात १ & १/२ वाटी स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली मेथी घालावी. २ मिनिटे परतावे व मेथी शिजू द्यावी. त्यात शिजवलेली डाळ व लागेल तसे पाणी घालावे (मला ही डाळ आमटी सारखी पातळ आवडते, म्हणून मी पाणी थोडे जास्त घातले आहे. पण दाट* आवडत असल्यास पाणी कमी घालावे). चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी आणावी. गरम गरम डाळ-मेथी पोळी किंव्हा भाताबरोबर वाढावी. 

*डाळ दाट करायची असल्यास, शिजल्यावर रवीने घुसळू नये. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा