डाळ-मेथी (प्रकार २)(चिंच-गुळाची) :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. १ वाटी तुरीची डाळ धुऊन घ्यावी व त्यात १ & १/२ वाटी मेथी स्वच्छ धुऊन व बारीक चिरून घालावी.
२. २ वाट्या पाणी घालून कुकर मधे तीन शिट्ट्या येईपर्यन्त शिजवावी. तीन शिट्ट्या झाल्यावर, गॅस बारीक करावा व ५ मिनिटांनी बंद करावा.
३. कुकर गार झाल्यावर डाळ बाहेर काढून रवीने घुसळावी.
३. १" वाळलेली चिंच १/४ वाटी गरम पाण्यात भिजत घालावी. तयार चिंचेचा कोळ वापरला तरी चालेल.
४. एका पातेल्यात, ४ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर, त्यात १/२ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून हिंग, ५-६ मेथीचे दाणे, १/२ टीस्पून हळद, व ५-६ कढिलिंबाची पाने घालावीत.
५. त्यात शिजलेली डाळ घालून आवडीप्रमाणे पाणी घालून पातळ करावी.
६. त्यात चवीप्रमाणे मीठ व तिखट, आणि भिजविलेल्या चिंचेचा कोळ (किंव्हा १/२ टीस्पून तयार कोळ) घालावा. २ टेबलस्पून गूळ, व २ टीस्पून काळा/गोड मसाला घालून एक उकळी आणावी.
७. गरम गरम डाळ-मेथी, पोळी किंव्हा भाताबरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा