शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

बर्फातील होळी


बर्फातील होळी



परदेशातील होळी न्यारी
खेळतो विना पिचकारी
बर्फात खेळतो होळी आम्ही
बर्फात खेळतो होळी 

सवड मिळेना कोणास कोठे 
बेत आखले मनात मोठे 
येत्या रविवारी करू पुरणपोळी 
तेंव्हाच पेटवू होळी 

हिमपाताने झाली मौज साऱ्यांची 
कामास मिळाली सुट्टी 
बर्फात खेळूया, मजा करूया 
शाळेला ही बुट्टी 

शेकोटीच्या उबेत बसुनी 
राग लोभाची पेटविली होळी
लाकडाच्या प्रज्वलित ज्वाळेत केली 
द्वेष मत्सराची राख रांगोळी

मुक्त आनंदाचे उधळून रंग 
परतली मुलांची टोळी 
घरी येउनी ताव मारती 
तुपा सवे पुरणाची पोळी 

कटाची आमटी, पोळी व पापड 
डोळ्यावरती आली झापड 
वाटे झोपेचीच घेतली गोळी 
बर्फात खेळलो होळी आम्ही 
बर्फात खेळलो होळी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा