कोबीच्या वड्या
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
एक वाटी हरभऱ्याची डाळ ४-५ तास भिजत घलायची. त्यात चवीप्रमाणे मिरची, २ चमचे जिरे, मीठ व चमचाभर साखर घालावी व सर्व मिश्रण मिक्सर मध्ये भरड वाटावे. वाटल्यावर साधारण भजीच्या पिठाप्रमाणे पातळ असावे. त्याच बेताने वाटताना पाणी घालवे. सर्व मिश्रण कुकर च्या मोठ्या भांड्यात ओतून त्यात बारीक चिरलेली ४ वाट्या कोबी घालवी. त्यातच २-३ छोटे चमचे (tsp) तेल ,२-३ चमचे (tsp) तीळ, २-३ छोटे चमचे बेसन, व चिमूटभर सोडा घालावा. सगळे कालवून कुकर चे भांडे कुकर मध्ये ठेवून १५-२० मिनिटे प्रेशर न ठेवता उकडावे. (काही भाज्या बऱ्याचदा पाणीदार असतात. तसे असल्यास १/२ तास उकडावे). गस बंद करून भांडे पूर्ण गार झाल्यावर सुरीने काप करावॆत. एका कढईत फोडणी(मोहरी, हिंग व हळदीची) करून त्यात सगळे काप टाकून, हलक्या हाताने फोडणीत मिसळावे. ५ मिनिटे परतून गस बंद करवा. वरून खोबरे कोथिंबीर घालून खायला द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा